नाटक कार समीक्षक जयंत पवार आता कथेच्या क्षेत्रातही आपली मुद्रा ठसठसीतपणे उमटवत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे .त्याना नुकत्याच प्राप्त झालेल्या साहित्य अकादमी पुरस्कारामुळे ही वस्तुस्थिती अधोरेखितच झाली आहे त्याचा प्रत्यक्ष पुरावा म्हणजेच अतुल पेठे यांनी सादर केलेला त्याच कथेच्या अभिवाचनाचा परिणामकारक एकपात्री रंगमंचीय आविष्कार. तळागाळातली माणसं ,अभावग्रस्तांच्यांं समस्या, त्यांचं जगणं हे त्याचे तळमळीचे विषय आहेत .ते त्यांचं अनुभव विश्व होतं .त्यमुळेच्, त्यांच्या कथा रसरशीत आणि स्वाभाविक झाल्या आहेत. रहस्यकथाच्या क्षेत्रात आजतागायत श्रमिकांना कधी वाव दिला गेला नव्हता .;गुंड होते पण कष्टकऱ्यांचे आस्तित्व नव्हते या' 'खुंटी 'वरच्या कथेचा निर्माता म्हणजे लेखक आणि तो दिवंगत अवस्थेत ज्याला आपली अपुरी कथा पुरी करायला सांगतो आहे तो त्याचा पुतण्याही कामगारवस्तीतील आहे आणि तेच कथेचे नायक आहेत. अर्थात इतर रहस्यकथातून आढळणारी सगळी पात्रंं इथं आहेतच नव्हे ती असायलाच हवीत.
पण त्या अगोदरची गम्मत अशी की या कथेच्या अंतर्गत आणखी एक वेगळीच रहस्य कथा आहे,नाटकात नाटक असावे तशी एक कथा शहरी जगात उच्चभ्रू समाजात धानिकांच्या छुप्या वृत्तितून वेवेगळ्या तऱ्हेवाईक व्य्क्तीरेखातून घटनातून गुंतवत जाते तर दुसरी सामन्यांच्या जगण्यातून गूढमयता निर्माण करीत आस्वादकाला खिळवून ठेवते. एकूण कथेचा लोंबकळता शेवट तर अचंबित करणारा अफलातूनच आहे. मिट्ट काळोख ,कोसळता पाऊस .स्त्रीपुरुष शरीर संबंध धनिकांची वृत्ती माणसांमधली विकृती घटनांची गुंतागुंत आणि गतिमानता या सगळ्या घटकांना घेऊन त्यातूनच रहस्य कथेची एक parady ते निर्माण करतात आणि एकाच वेळी रहस्यकथेची भेदकता आणि उपरोधिक विनोदाची रंजकता ते बेमालूमपणे साधतात.
अशी ही विलक्षण वेगळी कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करण्याची इच्छा अतुल पेठे यांच्या सारख्या सजग रंगकर्मीला होणे साहजिक आहे .त्य़ानी आपली इच्छा बरीचसी प्रभावीपणे पोचवली आहे.
कथेचे अभिवाचन ही कार्यक्रमाची घोषणा असली तरी प्रत्यक्षात सादरीकरण त्या कक्षा ओलांडून बरेच पुढे गेले. अदृश्य व्यक्तिंंचा बहुपात्री प्रयोग असेच स्वरूप प्रकट झाले.अतुल पेठे यांनी वेगवेगळे आवाज त्यातील आरोह अवरोहाच्या वेगवेगळ्या छटा,बोलण्यातील विविध गती यांचा कौशल्यपूर्ण वापर करून रंग्मंचाचा अवकाश भरून आणि भारून टाकण्याची किमया केलीआहे. साथीला प्रदीप वैद्य यांची अस्सल वातावरण निर्माण करणारी प्रकाश योजना. पार्श्व संगीताच्या गारुडामुळे 'अभिवाचन मंदावले आणि कार्यक्रमाचा तोल नाटकीपणाकडे अधिक झुकला.कथा प्रायोगिक पण रंगमंचीय आविष्कार व्यावसायिक असा प्रकार झाला .धोबळ्तेपासुन आणि बटबटीतपणापासून वाचणे ही या प्रयोगाची आणखी एक जमेची बाजू. सर्वस्वी वेगळा अनुभव अधिकाधिक लोकांपर्यंत पोचत असेल तर थोडा नाटकीपणा खुंटीवर ठेवायला हरकत नाही.
*Kamlakar Nadkarni has been a drama critic for 45 years. He has received various awards for the same from institutions such as the Akhil Bhartiya Natya Parishad. He has written a book on Chattrapati Shivaji and has also published books on theatre. His book ‘Mahanagari Natak’, published in 2015, is a compilation of his critical writing on plays he saw between 2000 and 2010. His upcoming book ‘Natki Natak’ will dwell on the history of the Maharashtra State Competition plays, right from Annasaheb Kirloskar. He was an active worker for ‘Bal Rangbhoomi’ along with Sudha Karmakar. He has written six plays of which 351390 won an award at the Maharashtra State Competition. Kamlakar Nadkarni has been an actor in his younger days and has won medals for acting in state competition plays.